शासनाच्या माध्यमातून दर्जेदार कामे व्हावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:05+5:302021-09-14T04:45:05+5:30
वाठार निंबाळकर : ‘शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो; मात्र त्यामधून दर्जेदार विकासकामे झाली पाहिजेत,’ असे ...

शासनाच्या माध्यमातून दर्जेदार कामे व्हावीत
वाठार निंबाळकर : ‘शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो; मात्र त्यामधून दर्जेदार विकासकामे झाली पाहिजेत,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
सस्तेवाडी (ता. फलटण) येथील अंगणवाडी इमारत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत व ग्रामपंचायत कार्यालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, बाजार समितीचे सदस्य संजय कदम, राम नाईक-निंबाळकर, सरपंच ज्ञानेश्वरी कदम, सुदाम कदम, सतीश सस्ते, शंकरराव जाधव, नामदेवराव धुमाळ, उपसरपंच बापूराव शिरतोडे, ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजीवराजे म्हणाले, ‘तीस वर्षांपूर्वी तालुक्यातील गावा-गावांत गटातटाचे राजकारण होते. तालुक्यातील सर्वच गावांत सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन चौफेर विकास करण्यासाठी प्रयत्न केला आहे. यापुढेही प्रयत्न केले जातील.’
कार्यक्रमासाठी महादेव माने, शाखा अभियंता अजय शितोळे, अजित सस्ते, सुनील वाबळे, सोसायटी चेअरमन चंद्रकांत सूर्यवंशी, अविनाश धुमाळ, सुरेश पखाले, तानाजी धुमाळ, दादा चव्हाण, विजय पानसरे, संजय जाधव, महेश जाधव, जोतिराम मुटेकर यांच्यासह सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, सरपंच ज्ञानेश्वरी कदम, संजय कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सतीशराव सस्ते यांनी स्वागत केले. आत्माराम सस्ते यांनी आभार मानले.