शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: सुडाचे राजकारण होऊ नये; अन्याय झाला तर आवाज उठवणार - शशिकांत शिंदे 

By नितीन काळेल | Updated: December 25, 2024 19:22 IST

अभयसिंहराजे लोकप्रिय; शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही..

सातारा : विराेधक हा निवडणुकीत असतो. आता सुडाचे राजकारण होऊ नये. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नवीन मंत्रीही सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. तरीही अन्याय झाला तर आंदोलनाने आवाज उठवू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. तसेच शरद पवार यांनी अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला नाही. त्यावेळी त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय झाले होते, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अर्चना देशमुख आदी उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत विचारात घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यातून सर्वांनाच सतर्क करायचे होते. राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झाले असून सातारा जिल्ह्यातील चारजण कॅबिनेट मंत्री झालेत. दोन उपमुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातील असल्यासारखेच आहेत. या सर्वांकडून जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील. जिल्ह्याचा विकासाचा बॅकलाॅग भरून निघेल, अशी आशा आहे.निवडणुकीनंतर राज्यात सरकार आले असलेतरी लोकांत अजून विश्वास दिसत नाही. कारण, बीड आणि परभणीसारख्या घटना घडल्या आहेत. राज्यात अशांततेचे वातावरण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यातच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते. तो लाभ पूर्वी ज्या महिलांना मिळाला तेवढ्यांनाच द्यायला हवा. दूध दराचा प्रश्न आहे. तसेच कांदा दर, ऊसदर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज मिळावी. शेतीपंपांना सोलर वीजची सक्ती करण्यात येऊ नये, अशीही आमची भूमिका आहे. यासाठी २७ डिसेंबरला साताऱ्यात दुचाकी रॅली काढून वीज कंपनी, वन विभागात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. तसेच हे प्रश्न न सुटल्यास जानेवारी महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. यातून पक्ष मजबूत करण्यात येणार येईल. तसेच पुढील काळात कार्यकर्त्यांवरही अन्याय होऊ देणार नाही.

अभयसिंहराजे लोकप्रिय; पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही..आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यामुळे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर आमदार शिंदे यांनी त्यावेळी पवार हे निर्णय घेत नव्हते. जिल्ह्यातील नेते निर्णय घेत होते. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे.

तसेच अभयसिंहराजेंमुळेच मला संधी मिळाली. मी त्यांच्याबरोबर असायचो. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे एवढे त्यांच्याकडे गुण होते. विलासराव देशमुख यांनी अभयसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून फोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण, अभयसिंहराजे हे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे पवार यांनी अन्याय केला नाही. तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय झाले. त्यामध्ये पवार यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShashikant Shindeशशिकांत शिंदेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSharad Pawarशरद पवार