बिदालमध्ये कृषीसंशोधन केंद्र व्हावे : रणजितसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:14+5:302021-09-14T04:45:14+5:30
दहिवडी : बिदाल हे गाव प्रगतशील शेतकऱ्यांचे मानले जाते. येथील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करतात. या गावात ...

बिदालमध्ये कृषीसंशोधन केंद्र व्हावे : रणजितसिंह नाईक-निंबाळकर
दहिवडी : बिदाल हे गाव प्रगतशील शेतकऱ्यांचे मानले जाते. येथील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करतात. या गावात कृषी संशोधन केंद्र व्हावे, त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू,’ असे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले.
बिदाल (ता. माण) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, ॲड. भास्करराव गुंडगे, श्रीकांत देशमुख, जयकुमार शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, लक्ष्मण बोराटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, बाळासाहेब जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘बिदाल गावाने खूप काही दिले आहे. या गावाने जे-जे मागितले ते-ते देण्याचा प्रयत्न केला.’
यावेळी पंचायत समिती सदस्या अपर्णा भोसले, सरपंच गौरी जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ, बाजार समितीचे संचालक शेखर गांधी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ भोसले यांनी आभार मानले.
१३दहिवडी
फोटो-बिदाल (ता. माण) येथे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, ॲड. भास्करराव गुंडगे, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.