संघटित झाल्याशिवाय न्याय नाही : काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:31+5:302021-09-03T04:41:31+5:30
सातारा : ‘समाज व आपापसातील वाद, भेदभाव विसरुन एकत्र येणे व संघटित झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही’, असे मत राष्ट्रीय ...

संघटित झाल्याशिवाय न्याय नाही : काळे
सातारा : ‘समाज व आपापसातील वाद, भेदभाव विसरुन एकत्र येणे व संघटित झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही’, असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब काळे यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील बनगरवाडी येथील वाघमोडे वस्तीवर आयोजित कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी दिलीप वाघमोडे, सचिन वाघमोडे, सागर सावंत, पंकज पोळ, सचिन गोरड, प्रथमेश केंगार, संजय चव्हाण, महादेव काटकर, ज्ञानोबा वाघमोडे, सोमनाथ अनुसे, पिंटू बनसोडे, शक्ती बनगर, विष्णू मंडले आदी उपस्थित होते.
सचिन वाघमोडे यांनी राजकारणातील चुकीच्या पध्दतीमुळे लोकांना पायाभूत विकासापासूनही दूर राहावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते अशा सोयी लोकप्रतिनिधी पूर्ण करु शकले नाहीत. यासाठी एकजूट झाले तरच न्याय मिळतो, असे सांगितले.
प्रथमेश केंगार यांनी परिचय करुन देत आभार मानले.
...............................................