खासदार निधी वापरण्याची माहितीच नाही; नरेंद्र पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:42 IST2019-04-05T22:42:39+5:302019-04-05T22:42:46+5:30
कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, ...

खासदार निधी वापरण्याची माहितीच नाही; नरेंद्र पाटील यांची टीका
कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, याचीही माहिती नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा विकास रोखणारा खासदार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.
पाटील यांनी गुरुवारी जावळी तालुक्यातील २६ गावांचा प्रचार दौरा पूर्ण केला. त्यावेळी त्यांनी गावोगावी जाऊन आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट केली.
नरेंद्र पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य मतदारही आता टीव्ही, फोनच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधीला पाहत असतात. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने जागरुकपणे आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. साताऱ्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी दहा वर्षांत काहीही कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पाच वर्षे संधी द्यायची का? याचा मतदारांनी फेरविचार करावा. मूलभूत सुविधांच्या अभावी आज तुमची मुले कधी तरी गावी येत असतात. परंतु तुम्ही निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून देणे न थांबवल्यास तुमची नातवंडे या ठिकाणी कधीच येणार नाहीत.’
ते पुढे म्हणाले की, ‘१९९५ मध्ये जावळीचा आमदार शिवसेनेचा होता तर १९९६ मध्ये सातारा लोकसभेचा खासदार शिवसेनेचा होता. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात वाहत असणाºया परिवर्तनाच्या वाºयातही जावळीला महत्त्वाची भूमिका निभावायची आहे. मी ही एक माथाडी असल्यामुळे माथाडींच्या समस्या मला माहिती आहेत. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना नेहमीच जावळी खोºयाने साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या वारसाला लोकसभेवर लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी माथाडी मोलाचे योगदान देतील, यात शंकाच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जावळी विभागातील धरणांची काम पूर्ण न केल्यामुळे शेतीस पाणी पोहोचू शकत नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामेही अपुरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत आला आहे.’
ेत्यांना दुसºया कामांसाठी वेळच नाही...
विद्यमान खासदार मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये मत मागण्यासाठीही पोहोचत नाहीत. त्यांना सातारा शहर, टोलनाके, एमआयडीसीमधील उद्योजकांना अडचणीत आणणे यातून दुसºया कामांसाठी वेळच मिळत नाही. मागण्यांचे निवेदन देताना माझी कोणाला भीतीही वाटणार नाही, अशा शब्दांत नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केली.