दत्तक गावात शाळा सोडून एक रुपयाचं विकासकाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:43+5:302021-02-05T09:17:43+5:30
कातरखटाव : खटाव तालुक्यात भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने वाढत चालला आहे. असे असताना एनकूळ गावानेही विरोधकांचा ...

दत्तक गावात शाळा सोडून एक रुपयाचं विकासकाम नाही
कातरखटाव : खटाव तालुक्यात भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने वाढत चालला आहे. असे असताना एनकूळ गावानेही विरोधकांचा धुव्वा उडवीत ६-३ ने विजय मिळवला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दत्तक घेतलेले गाव संसद झालं; पण एनकूळ गावात शाळा वगळता एकही रुपयाचं काम झालेलं दिसत नाही, अशी खरमरीत टीका विरोधकांवर एनकूळ येथे नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, खासदारकी जिंकणं सोपं असून, ग्रामपंचायत जिंकणं अवघड आहे. यापुढे या गावचा विकास चांगला झालेला दिसेल, तसेच कातरखटाव - एनकूळ उर्वरित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल. त्याचप्रमाणे ‘कुणी पायात साप सोडला तरी इकडे-तिकडे करू नका, गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन.’
जयकुमार गोरे म्हणाले, ‘सगळ्यांनी संघटित होऊन एकजुटीने काम केले तर काय घडू शकते, हे एनकूळकरांनी दाखवून दिले आहे. आत्ता सोसायटीत बदल घडवायचा आहे. त्यामुळे पाणी किती सोडल्यावर कोण-कोण वाहून जातंय, हे आत्ता समजू लागलंय.’
एनकूळच्या मातीत राहून सदाभाऊ खाडे यांनी पुण्यात अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळे भाजप मोठ्या ताकदीने तालुक्यात वाढत असून, माण- खटाव मतदार संघामध्ये ७६ सरपंचाचा मी सत्कार घेणार असून, याचं श्रेय कार्यकर्त्यांना जात आहे. शरद पवार यांच्या दत्तक एनकूळ गावात किती विकासकामे झाली, याचं राष्ट्रवादी पक्षानं आत्मचिंतन करावे, या भागात पाणी मागून मिळत नसेल तर पाणी हिसकावून घेण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे, असे सांगून एनकूळचा पाणी प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही गोरे यांनी दिली. युवा पिढी जोमाने पुढे येऊ लागली आहे.
यावेळी पिंपरी - चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव खाडे, धनंजय चव्हाण, विशाल बागल, राजेश निकम, रामभाऊ देवकर, अंकुशराव खरमाटे, अर्जुन दमणशेठ, दिलीप डोईफोडे, सपंत खाडे, अनिल माळी, श्रीमंत खरमाटे, श्रीमंत ओंबासे उपस्थित होते.
०१कातर खटाव
फोटो ओळ - एनकूळ येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी आ. जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले.