शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

vaishnavi hagawane death case: गुन्हेगाराला पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही - रूपाली चाकणकर 

By प्रमोद सुकरे | Updated: May 22, 2025 12:30 IST

प्रमोद सुकरे  कऱ्हाड: वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. हुंडा विरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यात ...

प्रमोद सुकरे कऱ्हाड: वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. हुंडा विरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यात वैष्णवी सारख्या महिलेचा जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून राज्य महिला आयोग याबाबत कडक भूमिका घेत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्या कराड दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होत्या.चाकणकर म्हणाल्या, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. काहीजण ताब्यात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे. कारवाई तर होणारच आहे पण त्याचा महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत.

खरंतर राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत. पण पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे कोणीही असले तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही.उलट ही विकृती ठेचून काढली पाहिजे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.तर राजेंद्र मागवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

महिला आयोगावर बोलणाऱ्या त्या कोण?राज्य महिला आयोगाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. या रोहिणी खडसेंच्या विधानाकडे लक्ष वेधले असता चाकणकर म्हणाल्या, खरंतर महिला आयोगावर बोलणाऱ्या त्या कोण आहेत? त्या तर वडिलांच्या नावावर निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याच कार्यालयातील पीए आणि त्याच्या बायकोच्या तक्रारी माझ्याकडे आहेत. त्या महिलेला त्या न्याय देवू शकत नाहीत.याचा त्यांनी अगोदर विचार करावा. उलट राज्य आयोगाचे काम गेल्या साडेतीन वर्षांमध्ये चांगले चालले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्याला विशेष महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेRupali Chakankarरुपाली चाकणकरPuneपुणे