शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:51 IST

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र ...

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा डाव खरंतर सर्वांनी ओळखला आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे; पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.चव्हाण म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे सरकारला ते टिकविता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित भेटून त्याची योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असेही चव्हाण यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर सांगितले.

त्यांचं घरातल्या घरात काय चाललंय समजत नाहीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्रित भेटले. याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, ‘त्यांचं घरातल्या घरात नेमकं काय चाललंय? हे समजत नाही. आणि त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे, असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना मिश्कीलपणे सांगितले.

कोण कोणती जागा लढणार, हे निश्चित नाहीतुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडीत जो निर्णय होईल, त्यावर पुढील दिशा ठरेल.’

ती त्यांची वैयक्तिक भूमिका..काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ती पक्षाची भूमिका नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही आमची मते मांडणार आहोत.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाSharad Pawarशरद पवार