रिफ्लेक्टर नसल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:59+5:302021-09-13T04:38:59+5:30

रिफ्लेक्टर नसल्याने वाहतुकीस धोका सातारा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत ...

Since there are no reflectors | रिफ्लेक्टर नसल्याने

रिफ्लेक्टर नसल्याने

रिफ्लेक्टर नसल्याने

वाहतुकीस धोका

सातारा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. प्रामुख्याने केळघर घाटातील धोकादायक वळणांवर कोठेडी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांंची फसगत होत आहे. काही दिवसांपूर्वी केळघर घाटात अपघात झाला होता. तसेच रस्ताही खचला होता. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

नागरिकांच्या गर्दीने

बाजारपेठ फुलली

सातारा : गणपती व गौराईचे आगमन झाल्याने घरोघरी उत्साहाला उधाण आले आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली असून, खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या संख्येने हेजरी लावत आहेत. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर प्रथमच बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली झाल्याने व्यापारी व विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Since there are no reflectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.