शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हातचलाखी, सराफी दुकानातून सहा तोळ्यांचे गंठण केलं लंपास; फलटणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:49 IST

सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करून हातचालाखीने सहा तोळ्यांचे गंठण केलं लंपास

फलटण : सोने खरेदी करण्याचा बहाण्याने अनोळखी दोन महिला व एका पुरुषाने हात चलाखीने सराफी दुकानातून सहा तोळ्यांचे गंठण लंपास केले. लंपास केलेल्या या गंठणाची किंमत २ लाख ९२ हजार रुपये होते. फलटण शहरातील एका सोन्याच्या दुकानात हा प्रकार घडला.येथील शांतीकाका सराफ अँड सन्स या दुकानातील सर्व कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडून हिशोब केला असता ६ तोळे वजनाचे २ लाख ९२ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे गंठण दिसून येत नाही, असे कर्मचाऱ्यांनी मालकांना सांगितले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये आदल्या दिवशी दुपारी १२. ४० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला व एक पुरुष यांनी सोन्याचे गंठण घ्यावयाचे आहे, असे सांगितल्याने त्यांना काऊंटरवर सेल्समन गंठण दाखवीत होते. सेल्समन यांनी त्यांना सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे गंठण दाखविले.सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करून हातचालाखीने त्यातील एका महिलेने ते गंठण तिचे एका हातातील पर्सखाली लपवून दुसरीच्या हातामध्ये दिल्याचे दिसले. त्यानंतर ते अनोळखी तिघेजण त्या दुकानातून काही एक खरेदी न करता घाईगडबडीमध्ये बाहेर निघून गेले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यानंतर नितीन शांतीलाल गांधी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी