कंपनीतून १५ लाखांच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:00+5:302021-03-20T04:39:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुक्यातील गोजेगाव आणि शेंद्रे येथील एका कंपनीतून १५ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी ...

कंपनीतून १५ लाखांच्या साहित्याची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा तालुक्यातील गोजेगाव आणि शेंद्रे येथील एका कंपनीतून १५ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैभव बर्गे आणि संदीप पावसकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, रघुनाथ हेमंत दुबे (वय २४, सध्या रा. पिरवाडी, सातारा, मूळ रा. जि. विदिशा, मध्यप्रदेश) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २ फेब्रुवारी ते दि. ६ मार्च २०२१ या कालावधीत वैभव बर्गे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) आणि संदीप पावसकर (रा. कारवार रोड, हुबळी, कर्नाटक) या दोघांनी कंपनीतील साडेसात लाखांचे ११ मीटर लांबीचे व २६० किलो वजनाचे ३२ लोखंडी इलेक्ट्रिक पोल, पाच लाख रुपयांचे कंडक्टर आणि फॅब्रिकेशन तसेच इतर साहित्य, ४५ हजार रुपयांचे सिव्हिल साहित्य, ३३ हजार रुपयांची कंपनीतील मशिनरी, ८५ हजार रुपये वेतन, आदी मिळून १५ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
...............................................