शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शटरचा पत्रा उचकटून ९० हजारांचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 17:57 IST

Crimenews Satara : सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जय हिंद फर्निचर ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शटरचा पत्रा उचकटून दोन अज्ञात महिलांनी ९० हजार ९०० रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशटरचा पत्रा उचकटून ९० हजारांचे साहित्य लंपासऔद्योगिक वसाहतीमधील प्रकार :अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल

सातारा : येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जय हिंद फर्निचर ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शटरचा पत्रा उचकटून दोन अज्ञात महिलांनी ९० हजार ९०० रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, निलेश भुपाल वाघमारे (वय ३४, रा. चाहूर कॉलनी, कृष्णानगर, सातारा) यांचा फर्निवर शॉप व मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र स्कूटर कंपनीजवळ त्यांचे जय हिंद फर्निचर आणि मॅन्यूफॅक्चरिंग नावाची फर्म आहे.

दि. २५ मे रोजी रात्री साडेआठ ते दि. ८ जून रोजी सायंकाळी साडेसहा या कालावधीत दोन अज्ञात महिलांनी कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या बंद पत्र्याच्या शटरचा पत्रा उचकटून कुलूप तोडून आत प्रवेश केला.

३२ हजार रुपये किमंतीचे चार हजार हँडल नग, १५ हजार रुपये किमंतीचे स्टेलनेस स्टीलचे ड्रावरचे एक हजार नग, सोफा बनविण्यासाठी लागणारी स्क्रू फिट करणारी १५ हजार रुपये किमंतीची मशिनरी, पंधराशे रुपयांची बिजागरी, ६ हजार रुपयांचे स्क्रू, १८ हजार रुपये किमंतीचे तीन हजार लॉक, १४०० रुपयांचे लोखंडी अँगल, दोन हजार रुपयांची बंद पडलेली मोटर असा ९० हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता हे साहित्य दोन अनोळखी महिला घेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.या घटनेनंतर निलेश वाघमारे यांनी याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस