ग्रामपंचायत शिपायाचा घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:24+5:302021-06-06T04:28:24+5:30

सातारा: तालुक्यातील रेवंडे येथे एका घरातून ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ...

Theft in the house of a Gram Panchayat soldier | ग्रामपंचायत शिपायाचा घरात चोरी

ग्रामपंचायत शिपायाचा घरात चोरी

सातारा: तालुक्यातील रेवंडे येथे एका घरातून ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, लहू रामचंद्र भोसले (वय ४२, रा. रेवंडे, ता. सातारा) हे ग्रामपंचायत शिपाई आहेत. दि. ३ मे रोजी त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने उघडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी लहू भोसले यांनी दि. ४ मे रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे हे करत आहेत.

Web Title: Theft in the house of a Gram Panchayat soldier