शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला

By दत्ता यादव | Updated: December 7, 2023 19:22 IST

पब्जी खेळत असताना दोघांची झाली ओळख, उत्तर प्रदेशहून भेटण्यासाठी साताऱ्यात आला

सातारा : घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे तर कारमध्ये घालून कास पठारावरही नेलं. या ठिकाणी एका शेतात पालथं झोपवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तरुणीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी १९ वर्षांची असून, तिचा मित्र उवैश नसीम अंसारी (वय २०) हा उत्तर प्रदेशमध्ये राहतो. पब्जी खेळत असताना दोघांची ओळख झाली. सोमवार, दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता पीडित तरुणी आणि उवैश हा सातारा शहरातील एका लॉजवर निघाले होते. तरुणीच्या घरातल्यांना तिची शंका आल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचा पाठलाग करत तिचा चुलत भाऊ, दोन काका लाॅजपर्यंत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिचा मित्र उवैश हा लाॅजमध्ये निघाले होते. तत्पूर्वीच घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. तिच्या मित्राला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये घालून कास पठार परिसरात नेले. या ठिकाणी रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून उवैशला एका शेतात नेले. या ठिकाणी त्याला पालथे झोपवून त्याच्या पाठीवर, पायावर बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर त्याला घेऊन संबंधित नातेवाईक सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार उवैशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.दरम्यान, नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या उवैशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ, लहान व मोठे काका यांच्यासह अनोळखी दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सध्या उवैश अंसारी हा पोलिसांच्या कोठडीत आहे.उवैश घेतोय अभियांत्रिकीचे शिक्षण..उवैश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. उत्तर प्रदेशहून तो तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आला होता. मात्र, तरुणीच्या घरातल्यांनी त्याला पकडल्याने तो सध्या जेलची हवा खात आहे. त्याच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. परंतु अद्यापही कोणी आले नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस