शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

By दत्ता यादव | Updated: August 26, 2022 14:43 IST

त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला.

सातारा : साताऱ्यातील सायन्स कॉलेज परिसरात एका तरुणाने चक्क नग्नावस्थेतच रस्त्यात बैठक मारली. त्याच्या या कृत्याने पादचाऱ्यांचे डोळे मात्र मोठे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या तरुणाला कपडे घालून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक् झाले.पोवई नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सायन्स कॉलेज आवारात विद्यार्थी, पादचारी व विक्रेत्यांनी नेहमीच रेलचेल सुरू असते. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक तरुण नग्नावस्थेत सर्वत्र फिरू लागला. त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला. तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा कयास बांधून काही नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तरुणाला कपडे आहे. यानंतर त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या या विचित्रपणाची चर्चा नागरिकांमध्ये दिवसभर सुरू होती. दरम्यान, संबंधित तरुण हा एका कंंपनीत कामाला असून, उंब्रज (ता. कऱ्हाड) परिसरातील तो रहिवासी आहे. उपचारानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollegeमहाविद्यालयPoliceपोलिस