Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात 

By दीपक देशमुख | Published: December 23, 2023 05:06 PM2023-12-23T17:06:47+5:302023-12-23T17:06:47+5:30

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स व इतिहास तज्ञांच्या कमिटीकडून पाहणी

The work of making the statue of Afzal Khan Vadh is in its final stages | Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात 

Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात 

सातारा : अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करण्याचे काम मुंबईतील जे. जे. आर्टस ऑफ कॉलेजला दिले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि इतिहास तज्ज्ञांच्या समितीकडून करण्यात आली. यावेळी तज्ज्ञांकडून आवश्यक त्या सुचना करण्यात आल्या. शिल्प बनून ते प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या ठिकाणी बसवण्याची प्रतीक्षा आता इतिहासप्रेमींना लागली आहे.

शासनाच्यावतीने प्रतापगडावर श्रीशिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाने शिवप्रतापाचे शिल्प बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार जे. जे. आर्टस ऑफ कॉलेज, मुंबई यांच्याकडून पुतळा बनवण्यासाठी निविदाही मागविल्या. त्यानुसार काम सुरू होऊन अंतिम टप्प्यात आले आहे. या शिल्पाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे, मुंबईचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, मुर्तीकार नितीन मेस्त्री, किशोर ठाकूर, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रा. डॉ. विजय सपकाळ, शशिकांत काकडे व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. 

यावेळी इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अफजलखानाच्या लढाई दरम्यान असलेल्या वयाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वय वर्षे २९ व अफजलखानाचे वय वर्षे ५५ ते ६० च्या दरम्यान असल्याने त्या वयाप्रमाणे दोघांची चेहरेपट्टी असावी असे सुचवले. त्याचबरोबर मूर्तिकार किशोर ठाकूर व नितीन मेस्त्री यांनी काही सूचना केल्या. हिंदू एक आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनीदेखील कमिटीस काही सूचना केल्या. यावेळी गजानन मोरे, चेतन भोसले, श्रीधर मेस्री उपस्थित होते.

Web Title: The work of making the statue of Afzal Khan Vadh is in its final stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.