Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By सचिन काकडे | Published: March 13, 2024 02:15 PM2024-03-13T14:15:02+5:302024-03-13T14:15:16+5:30

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

the water channel of the Kanher scheme burst during the work of the bridge In Satara, Water supply off for two days | Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या कामासाठी खोदकाम सुरू असतानाच कण्हेर योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले शिवाय शाहूपुरीचा दैनंदिन पाणीपुरवठाही ठप्प झाला. मंगळवारी पाणीकपात व बुधवारी पाणीच न आल्याने येथील नागरिकांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागला.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु हे काम पूर्ण न झाल्यास येथील रहिवाशांना गुरुवारी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकताे. त्यामुळे जीवन प्राधिकरणे शाहूपुरी भागाला तात्पुरत्या स्वरुपात कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, कोटेश्वर उपसा केंद्रातील पंप नादुरुस्त असतील तर ते तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी भारत भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महानुभव मठाजवळही गळती..

साताऱ्यातील महानुभव मठाजवळ असलेल्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला बुधवारी सकाळी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याने महानुभव मठ व आकाशवाणी झोपडपट्टी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिनीवरुन अवजड वाहन गेल्याने हा प्रकार घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: the water channel of the Kanher scheme burst during the work of the bridge In Satara, Water supply off for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.