शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे जल सत्याग्रह आंदोलन, सरकार विरोधी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:12 IST

विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक

ढेबेवाडी/सणबूर : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणाच्या जलाशयात उतरून जल सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सरकार विरोधी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनाद्वारे धरणस्थळी देण्यात आला.

पालकमंत्री शंभूराज देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील विषयांवर प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने धरणस्थळी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गुरुवारी धरणग्रस्तांनी जलाशयात उतरून सरकार विरोधी तीव्र आंदोलन उभारले.यावेळी धरणग्रस्त संघटनेचे प्रमुख जितेंद्र पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. त्यावेळी तातडीने या मागण्यांबाबत हालचाली चालू करू असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, त्याच बैठकीत पंधरा दिवसांमध्ये ठोस निर्णय न झाल्यास धरणस्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाला दिलेली मुदत संपूनसुद्धा अजूनही धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.

धरणग्रस्तांच्या मागण्या..

  • कऱ्हाड, पाटण तालुक्यातील लाभ क्षेत्रात धरणग्रस्तांच्या नावे पसंती नसताना वाटप झालेल्या जमिनी रद्द करून त्यांच्या मागणीप्रमाणे पुनर्वसनाचा लाभ मिळावा.
  • मेंढ येथील पुनर्वसन गावठाणमधील पाण्याचा व सुधारित गावठाणचा नकाशा या प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करावा.
  • अनेक वर्ष प्रलंबित असणारी संकलन दुरुस्तीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावी.
  • जमीनऐवजी रोख रक्कम मंजूर असतानासुद्धा प्रांत कार्यालय पाटण यांच्याकडून मराठवाडी येथील वयस्कर महिला सुभद्रा शिंदे यांची रोख रक्कम तत्काळ मिळावी.
  • उमरकांचन येथील तीन धरणग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई शासनाकडे जमा असून, त्यातील ६५ टक्के रक्कम कपात करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळावा.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन