शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचं नदीत डोकं कोसळलं, पुलावर राहिलं शरीर; वाढे फाट्यावरील घटना

By दत्ता यादव | Updated: May 3, 2023 14:16 IST

चालकाला डुलकी लागल्याने अपघात

सातारा : कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रक नदीत कोसळता कोसळता बालम बाल बचावला. मात्र, ट्रकचं डोक नदीत कोसळलं तर शरीर पुलावरच राहिलं. हा विचित्र अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास वाढे फाट्यावरील वेण्णा पुलावर झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरहून नारळ घेऊन ट्रक पुण्याला निघाला होता. वाढे फाट्यावरील वेण्णा पुलावर आल्यानंतर चालकाला डोळा लागला. त्यामुळे पुलाचा कठडा ताेडून संपूर्ण ट्रक नदीत कोसळणार इतक्यात ट्रकचा पाठीमागील भाग पुलाला अडकला आणि पुढील भाग नदीत कोसळला मात्र, उर्वरित ट्रकची बाॅडी पुलावरच राहिली. ट्रकच्या केबीनमध्ये ट्रकचालक होता. हे केबीन नदीत कोसळल्याने ट्रकचालक आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाला. 

या अपघातानंतर संपूर्ण पुलावर नारळ विखुरले गेले. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रकचालक आणि अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचीही ओळख पटली नसून, सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर