शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फुलं पाहायला कासला निघालाय, हंगाम सुरू, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:39 IST

सातारा : जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांचा राबता वाढला आहे. मात्र, हंगामाच्या बाबत ...

सातारा : जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांचा राबता वाढला आहे. मात्र, हंगामाच्या बाबत अवास्तव कल्पना घेऊन आलेल्या पर्यटकांमधून काहीसा नाराजीचा सूर समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. टिपेला गेलेला फुलांचा बहर डोळ्यात साठवून ठेवायचा असेल तर पर्यटकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर गेल्या काही दिवसांत कास पठारावर रानफुलांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. वनविभागाने कार्यकारी समितीच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांची सोय करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली. याबाबतचे वृत्त समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याने लांबून येणाऱ्या पर्यटकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पठाराचे बाजारीकरण व ‘कासचा हंगाम सुरू’ अशा मथळ्याखाली माहितीचा प्रसार झाल्याने आता फुलांचा गालिचा पाहायला मिळणार अशा अपेक्षेने पर्यटकांची रीघ पठाराकडे वळली. पठारावर सध्या एकूण बहराच्या ४० ते ५० टक्केच फुलोरा पाहायला मिळत आहे.

वस्तुस्थिती काय सांगतेजूनच्या पावसानंतर कास पठार हिरवाईने नटते. पाऊस थांबल्यानंतर उन्हाने पठार तापले की फुलांना बहर चढतो. सप्टेंबर अखेरीला पठार पूर्ण बहरात असते. हा बहर ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत दिसतो. सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळदीची पांढरी फुले पाहायला मिळत आहेत.

फुलांना सुरुवात, पण बहर कमी!वनविभागाने विकास पर्यटनासाठी सुरू केलेल्या अधिकृत www.kas.ind.in या वेबसाईटवर या संदर्भातील स्पष्ट चित्र मांडले आहे. ‘कास पठारावरील फुलांच्या बहरास सुरुवात झाली आहे. मात्र, फुलांचा बहर कमी आहे’ असे निवेदन वन विभागाने लाल अक्षरात वेबसाईटवर केले आहे.

कास पठारावर फुलांचा गालिचा असेल अशी अपेक्षा पर्यटकांनी करू नये. पठाराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे गालिचे पाहायला मिळतात. सप्टेंबर अखेरीस बहर पूर्ण फुललेला असेल, असा अंदाज आहे. - सुनील भोईटे, मानव वन्यजीव रक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन