शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या टायरने घेतला पेट, सैदापूरजवळ थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:45 IST

ओगलेवाडी : सैदापूर ता. कऱ्हाड येथे विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरच्या मागच्या टायरला आग लागली. हा टँकर लोकांनी थांबवून आग ...

ओगलेवाडी : सैदापूर ता. कऱ्हाड येथे विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरच्या मागच्या टायरला आग लागली. हा टँकर लोकांनी थांबवून आग विझवण्यासाठी सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. या टँकरमध्ये रसायनाने भरलेले असल्याने वेळीच आग विझवली नसती तर मोठी हानी झाली असती. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून वाहतूक इतर मार्गाने वळविली.याबाबत माहिती अशी की, विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरला सैदापूर हद्दीत कृष्णा कालव्याजवळ आल्यानंतर अचानक आग लागली. ही आग टँकरच्या मागील चाकाजवळ लागल्याने चालकाच्या लक्षात आले नाही. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी हा टँकर पाहिल्यानंतर सतर्कता दाखवली. लोकांनी हा पेटता टँकर थांबवला आणि आग विजविण्यासाठी सहकार्य केले. या टँकरमध्ये रसायन भरलेले होते. यामुळे वेळीच आग विझवली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. त्याची खबर लागताच कराड शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी तात्काळ हजर झाले. त्यांनी या मार्गावरील वाहतूक बनवडी मार्गे वळवली. या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बघ्यांची गर्दी मोठी झाली होती. परंतु नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने आणि योग्य मदत केल्याने आग विझवण्यात आणि पुढील अनर्थ टाळण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग