शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांना दिलासा! थंडी पळाली; पारा १८ अंशांवर, यंदा दोन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 13:15 IST

सातारा शहरातील पारा एकदमच घसरला

सातारा : सातारा शहरासाठी जानेवारी महिना गारठ्याचा ठरून दोन वर्षांतील नीचांकी तापमानाचीही नोंद झाली होती. पण, दोन दिवसांपासून थंडी पळाली असून, पारा १८ अंशांवर गेला आहे. त्यामुळे सातारकरांसाठी येथून पुढे कडाक्याची थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे.सातारा शहरात मागील तीन महिन्यांपासून थंडी पडत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीव्रता कमी होती. दरवर्षीच डिसेंबरमध्ये सातारा शहराचे किमान तापमान १० अंशापर्यंत खाली येते. तसेच एखाद्या वर्षी शहराचा पारा ७ अंशापर्यंत घसरल्याचेही पाहायला मिळाले. पण, यावर्षी डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता नव्हती. मात्र, जानेवारी महिना उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता वाढत गेली. जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत कडाक्याची थंडी सातारकरांनी अनुभवली. त्यावेळी १० जानेवारीला किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे दोन वर्षातील नीचांकी पाऱ्याची नोंद झाली होती. त्यानंतर लागोपाठ चार दिवस साताऱ्याचे किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहिले. यामुळे सातारकरांची चांगलीच हालत झाली. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. त्याचबरोबर सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली होती, असे असतानाच मागील चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. बुधवारी तर साताऱ्याचा पारा १८.०२ अंश नोंद झाला. यामुळे जानेवारी महिन्यात पारा प्रथमच १८ अंशावर गेल्याचेही समोर आले. तर येथून पुढे थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा शहरातील कमाल तापमानातही वाढ होत चालली आहे. ३१ अंशावर तापमान जात असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवत आहे.दरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरलाही कडाक्याची थंडी होती. त्यामुळे वेण्णालेकसह अन्य काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याचे प्रकारही घडले होते. मात्र, आता महाबळेश्वरचा पाराही वाढला आहे. बुधवारी १४.०९ अंशाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरलाही थंडी कमी झाल्याचे चित्र आहे.

सातारा शहरात नोंद किमान तापमान...दि. १५ जानेवारी १२.०७, १६ जानेवारी १२.०७, १७ जानेवारी ११.०९, १८ जानेवारी १२. १९ जानेवारी १३.०१, दि. २० जानेवारी १३, २१ जानेवारी १३.०४, २२ जानेवारी १३.०३, २३ जानेवारी १३.०७. २४ जानेवारी १४.०५ आणि दि. २५ जानेवारी १८.०२

एका दिवसांत तीन अंशांचा उतार...सातारा शहरातील पारा एकदमच घसरला आहे. एकाच दिवसात तीन अंशांनी घसरण झाली. यामुळे थंडीही एकदम कमी झाली आहे. त्यातच वारेही बंद असल्याने गारठा गायब झाल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान