शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणच्या मनोमिलनात नाराजीचा पडला खडा, अशोकराव जाधव यांच्या स्टेटसमुळे उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:35 IST

वरवर पाहता शांत वाटणारे मनोमिलन चांगलेच हादरे देणार ठरु शकते

विकास शिंदेफलटण : पितृपक्षांतर फलटणला राजकीय भूकंप या आशयाची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर फलटणच्या या कथित मनोमिलनाची चाचपणी बारामतीनेही केली. या मनोमिलनावर नाराज होऊन ? सलग सात वेळा फलटण पालिकेत नगरसेवक राहणारे माजी खासदार रणजितसिंह यांचे कट्टर निष्ठावंत समर्थक अशोकराव जाधव यांनी पहाटे पाच वाजता समाज माध्यमांवर स्टेटस ठेऊन खळबळ उडवून दिली. यामुळे वरवर पाहता शांत वाटणारे मनोमिलन चांगलेच हादरे देणार ठरु शकते, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.अशोकराव जाधव यांनी "लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून मी लवकरच भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असून या पुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही " असा संदेश सामाजिक माध्यमांवर स्टेटस म्हणून ठेवल्याने फलटणच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

मनोमिलन लांबणीवर ..मनोमिलन होण्यासाठी अनेक राजकीय हालचाली फलटणच्या बाहेर सुरू होत्या यातच पितृपक्षांतर दिग्गज नेते पक्षांतर करणार असल्याचे वृत्तही होते परंतू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुबंई मध्ये आपली पॉवर दाखवल्याने कथित पक्षांतर लांबणीवर पडले असले तरी कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो .

वीर धरणावर काय ठरले ..?काही दिवसांपूर्वी वीर धरणावरील रेस्ट हाऊस येथे दोन दिग्गज नेते मंडळींची त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांसह बैठक झाली ? या बैठकीत अनेक जुन्या गोष्टींवर चर्चा झाली असून पुढील वाटचाल कशी होणार यावर देखील चर्चा झाली  परंतू फलटण येथील दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांना ही गोपनीय भेट माहीत नाही यया भेटीत एकमेकांना पूरक गोष्टी ठरल्या गेल्या असल्याचे ही खास सूत्रांकडून समजले आहे परंतू अशी बैठक खरंच झाली की ही अफवा आहे याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

माझ्या वॉर्डातील विकास कामांबाबत काही मतभेद झाले होते, परंतु माजी खासदारांनी सकारात्मक निर्णय घेऊन सर्व गैरसमज दूर केले आहेत. यापुढे मी खासदार गट व भाजप पक्षासोबतच काम करणार आहे. - अशोकराव जाधव, माजी नगरसेवक

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Discord in Phaltan Alliance, Jadhav's Status Creates Stir

Web Summary : Ashokrao Jadhav's social media post expressing resignation from BJP and the MP group stirred political circles in Phaltan. This follows news of a potential alliance and delayed party changes influenced by Ajit Pawar. Meetings discussing future strategies occurred, though uncertainty surrounds their impact.