शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे शिंदे सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा घेतला निर्णय, पालकमंत्री शंभूराज देसाईंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 17:25 IST

शिवसेना पक्षप्रमुखांचा 'तो' निर्णय न पटणारा होता.

चाफळ : ‘सुरुवातीलाच भाजप-युतीचे सरकार असा फॉर्म्युला ठरलेला असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय न पटणारा होता. भविष्यात आमच्यावर घाला घालणारा निर्णय असल्यामुळेच माझ्यासह इतर आमदार, खासदारांनी शिंदे सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला,’ अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.माजगाव, ता. पाटण येथे चाफळ भागासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या चरेगाव-चाफळ-दाढोली रस्ता ते चाफळ फाटा ते गमेवाडी या रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण कामाचे भूमिपूजन व नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, बी. आर. पाटील, डी. वाय. पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम पाटील, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे, प्रशांत पाटील, गोरख चव्हाण, अॅड. चंद्रकांत कुलकर्णी, प्रकाश नेवगे, राजेंद्र पाटील, उमेश पवार, सुरेश काटे उपस्थित होते.मंत्री देसाई म्हणाले, ‘माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही तालुक्यातील १३० गावे व वाड्या-वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत. वीज, पाणी या मूलभूत सोयीही करण्यात आल्या आहेत. असाच विकास संपूर्ण जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे.’कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ, विभागातील विविध गावचे सरपंच, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गोरख चव्हाण यांनी आभार मानले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना