शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अखेर 'आले' खरेदीवर तोडगा निघाला, प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:30 IST

अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहन

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी सातारा बाजार समितीने रविवारी व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक आयोजित केली. बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. व्यापाऱ्यांकडून नवीन व जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरण्याची वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, जेणेकरून तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.

बैठकीत खरेदीदार व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले शेतमाल बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावा. व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले.अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहनबाजार समितीचा परवाना नसलेल्या काही जणांकडून सौद्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहन सभापती विक्रम पवार यांनी केले आहे. परवानाधारक नसणाऱ्यांना शेतमाल विक्री केल्यास झालेल्या फसवणुकीला बाजार समिती जबाबदार राहणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार