शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: लैंगिक अत्याचारातील ‘त्या’ २४ मुलांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात, तपास अत्यंत गोपनीय सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:05 IST

प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू

सातारा : शहरातील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचारात बळी पडलेल्या २४ मुलांचा जाबजबाब घेण्याचे काम सातारा शहर पोलिसांनी सुरू केले. संबंधित केअर टेकरचे कारनामे आपल्या जबाबात सर्व पीडित मुले नमूद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.सातारा शहरातील एका प्रसिद्ध शाळेमध्ये आठवडाभरापूर्वी केअर टेकरच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका मुलाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित केअर टेकरला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली असता त्याने आणखी २४ मुलांचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांच्या चाैकशीत पुढे तब्बल २४ मुलांच्या तक्रारी आल्या. तक्रारींची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांनी प्रत्येक मुलाचा जाबजबाब घेण्याचे काम हाती घेतले आहे. 

वाचा: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरलेगेल्या दोन दिवसांपासून संबंधित शाळेत जाऊन पोलिस मुलांचा जबाब घेत आहेत. पालक, शिक्षक आणि साध्या वेशातील पोलिसांचा त्यामध्ये समावेश आहे. त्या केअर टेकरने केलेला घृणास्पद प्रकार आता पुढे येऊन मुले धडधडीतपणे सांगत आहेत. त्यातील सर्व मुले अल्पवयीन असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणाचे पुरावे गोळा करून लवकरच बालकल्याण समिती व न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे. संबंधित आरोपीला शिक्षा होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.‘त्या’ प्रसंगातून पालक सावरताहेत..संबंधित मुलांवर घडलेल्या प्रसंगातून त्यांचे पालक सावरत आहेत. मात्र, मुलांना धीर देण्यासाठी आणि मुलांनी ही घटना विसरून शिक्षणाकडे लक्ष द्यावे, यासाठी पालकांना सतत शाळेत यावे लागत आहे. असेही एका पालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara School Abuse: Statements Recorded, Investigation Underway for 24 Children

Web Summary : Satara police are recording statements from 24 children abused at a reputed school. A caretaker's actions were revealed after a complaint. The investigation is confidential, prioritizing the children's well-being, with a report soon to be submitted to the child welfare committee and court. Parents are urged to support their children.