शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला कारभारी, पंचायत समिती सभापतींची प्रवर्गनिहाय संख्याही स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:45 IST

अध्यक्ष व सभापती अडीच वर्षांसाठी..

सातारा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून, ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समिती सभापतींसाठीही प्रवर्गानुसार संख्या निश्चित केली असून, सोडतीनंतर आरक्षण काढले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायती समिती सभापती ही पदे अडीच वर्षांसाठी असणार आहेत.सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समितींची निवडणूक पुढील काही महिन्यांत होत आहे. यासाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. तर, आता राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. ११ पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्याही स्पष्ट केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणते आरक्षण राहणार, याकडे लक्ष लागले होते.

अध्यक्ष व सभापती अडीच वर्षांसाठी..जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदासाठी प्रवर्गाचे आरक्षण कसे राहणार, हेही स्पष्ट झालेले आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अधिक सभापतीपदे आहेत. तर, आताचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण हे अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी नवीन प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होणार आहे.

जिल्ह्यातील सभापतीपदांसाठी प्रवर्गानुसार आरक्षण व संख्या- अनुसूचित जाती महिला १- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) १- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) २- सर्वसाधारण प्रवर्ग ४- सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) ३

ओबीसी महिला आरक्षण कायम..सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी तीन वर्षांपूर्वी आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार नव्याने पुन्हा ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद राखीव झाले. पण, आताच्या महायुती सरकारने चक्रानुक्रमे सोडत न काढता नव्याने आरक्षण जाहीर केले. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलेला पुन्हा लाॅटरी लागली आहे.

यापूर्वी हेमलता ननावरे अध्यक्षा..सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दुसऱ्यांदा ओबीसी प्रवर्गातील महिला भूषविणार आहे. यापूर्वी वाई तालुक्यातील हेमलता ननावरे या अध्यक्षा झाल्या होत्या. १८ फेब्रुवारी २००५ ते २० मार्च २००७ पर्यंत त्या अध्यक्षपदी होत्या.