शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावत्या फाडणाऱ्या हातात आले खोरं अन् पाटी, रस्त्यावरील मुजविले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:21 IST

पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात आदळून दुचाकीस्वार पडला. त्याचवेळी साताऱ्यातील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार हे गस्त घालण्यासाठी तेथून निघाले होते. त्यावेळी नागरिकांनी ही बाब शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. शेलार यांनी वेळ न दडवता कर्मचाऱ्यांना बोलावून खड्डा मुजवून घेतला.

सातारा : साताऱ्यातील चौकाचौकात दबा धरून बसलेले अन् एखाद्या वाहनचालकाकडून चूक घडली की पोलीसदादांनी शिट्टी वाजविलीच म्हणून समजा. वाहनचालकांना थांबवून दंड घेऊन हातात पावती ठेवतात; पण याच हातांनी शनिवारी फावडे धरून रस्त्यातील खड्डा मुजविला. सातारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे कौतुक होत आहे.याबाबत माहिती अशी की, साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अशात शनिवारी साताऱ्यात पोवईनाक्याकडून सातारा पालिकेकडे जाण्याच्या मार्गावर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ मोठा खड्डा पडला होता. त्यातच सायंकाळी पाऊस पडत होता. पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात आदळून दुचाकीस्वार पडला.त्याचवेळी साताऱ्यातील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार हे गस्त घालण्यासाठी तेथून निघाले होते. त्यावेळी नागरिकांनी ही बाब शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. खड्डे मुजविणे पालिकेची जबाबदारी असली तरी शेलार यांनी वेळ न दडवता कर्मचाऱ्यांना बोलावून खड्डा मुजवून घेतला. कर्मचाऱ्यांनी फावडे, पाटी आणून शेजारीच पडलेली खड्डी आणून खड्डा मुजविला. त्यामुळे अनर्थ टळला.सहायक पोलीस फौजदार महादेव खुडे, पोलीस नाईक महेश बनकर, पोलीस नाईक सोमनाथ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश नावडकर, योगेश जाधव यांनी खड्डा मुजविला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस