शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:07 IST

पुरातन चांदोबाचा लिंब पासून दूरवर घेतले रिंगण 

विकास शिंदेफलटण : पायी पायी पंढरीला । माझा वारकरी निघालावाटे थांबे विसाव्याला | खेळ विठूचा मांडीलाचाले रिंगण सोहळा | खेळ विठूचा मांडीला |या भक्ती गीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र यावर्षी या रिंगण सोहळ्याला भाविकांच्या गर्दीने तब्बलवतीं ते चार वेळा जागा पुढे बदलत रिंगण सोहळा कसाबसा पार पाडावा लागला. यामुळे पोलिस प्रशासनाने केलेली सगळी तयारी वाया गेली व आयत्या वेळी भाविकांच्या गर्दीत रिंगण लावावे लागले.दरवर्षी पुरातन चांदोबाचा लिंब येथे डाव्या बाजूला हे रिंगण लावले जाते. यावर्षी नेहमीच्या जागेवर हे रिंगण लावले होते. यासाठी दोन्ही बाजूला पोलिस, स्वयंसेवक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संरक्षक दोर लावले होते. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नगारखाना पुढे गेल्यानंतर दोन्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी तयार झाले. याच वेळी माऊलींची पालखी पुरातन चांदोबाचा लिंब येथे आली. रिंगण सोहळ्यात रथा पुढील सत्तावीस दिंड्या दोन्ही बाजूला उभ्या राहतात. यावर्षी रिंगण सोहळ्यासाठी या दिंड्यांना दुतर्फा उभे राहता आले नाही. त्यातच पाठीमागून येणाऱ्या भाविकांचा लोंढा रिंगण सोहळ्यात सामील होत होता. यामुळे अभूतपूर्व गोंधळात तब्बल तीन वेळा जागा बदलून रिंगण नेहमीच्या ठिकाणा पासून अर्धा किलोमीटर अंतरावर कसेबसे रिंगण लावले याच गर्दीत दोन्ही अश्वांनी वाट काढत त्यांचे कार्य कसेबसे पार पाडले. मात्र रिंगण सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. यामुळे भाविक नाराज झाले.

रिंगणाची जागा कोणी बदलली?विश्वस्त व पोलिस यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला असावा तसेच पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे नेहमीच्या जागेवर बंदोबस्त लावला होता आयत्या वेळी रिंगणाची जागा कोणी बदलली हे समजू शकले नाही 

भाविकांची गर्दी व गोंधळभाविकांची गर्दी बाजूला करण्यासाठी पोलिस अतोनात प्रयत्न करत होते शेवटी विश्वस्त देखील मदतीला आले परंतू गर्दी काही कमी होत नव्हती त्या मुळे पोलिसांना आयत्या वेळी बदल करावा लागला भाविक नाराज झाले असले तरी भाविकांनी देखील शिस्त पाळायला हवी होती असे काही भाविकांनी मत व्यक्त केले