शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत नगराध्यक्ष पदग्रहणावेळी सातारा ‘महापालिके’ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:14 IST

पुढची निवडणूक महापालिका म्हणून लढविण्याचे संकेत

सातारा : ‘सातारा शहराचा कायापालट करून नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजवर झालेला विकास आणि आगामी पाच वर्षांतील आमचे ठोस नियोजन पाहता, साताऱ्याची पुढची निवडणूक ही नगरपालिका म्हणून नाही, तर महापालिका म्हणूनच लढली जाईल,’ असे स्पष्ट संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे येणाऱ्या पाच वर्षांत साताऱ्याची वाटचाल महापालिकेच्या दिशेने सुरू होणार असल्याचे निश्चित झाले.सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारला. या स्वागत समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज सातारकरांना त्यांचे लोकनियुक्त प्रतिनिधी मिळाले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधीचा ओघ कमी पडणार नाही. येणाऱ्या २५ फेब्रुवारीला राज्याच्या बजेटमध्ये साताऱ्यासाठी पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी निर्मूलन आणि आधुनिक मंडई यासह अन्य विकासकामांचे प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक नगरसेवकाने केवळ प्रभागापुरता विचार न करता शहर म्हणून काम करावे, जेणेकरून महापालिकेचा दर्जा मिळवणे सुलभ होईल.मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अविनाश कदम, दत्ता बनकर, मनोज शेंडे, धनंजय जांभळे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, सिद्धी पवार, आशा पंडित, विजय देसाई, भारती शिंदे, मुक्ता लेवे, विजय काटवटे, भाजप शहर अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांच्या अपेक्षांना तडा जाऊ देऊ नका : उदयनराजेखासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच सभागृहातून झाली. लवकरच आपण नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीत प्रवेश करणार आहोत. मात्र, इमारत कितीही मोठी असली, तरी सातारकरांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. समाजसेवा हाच आमचा निवडणुकीचा निकष होता आणि तोच कामातही दिसायला हवा. शहराच्या हितासाठी आम्ही दोघेही सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

सातारकरांसाठी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करून शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठयाला प्राधान्य देणार आहे. नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि पारदर्शक कारभार देणे, हे आमच्या कारभाराचे मुख्य सूत्र असेल. - अमोल मोहिते, नूतन नगराध्यक्ष, सातारा.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipality to become Corporation, Announcement during Mayor Inauguration

Web Summary : Satara is set to transform into a Municipal Corporation. Minister Shivendrasinharaje Bhosale announced this vision at the mayor's inauguration. Focus is on improved infrastructure, 24/7 water supply, and efficient governance, supported by state funding for key projects.