शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पावणे नऊला मिनी मंत्रालयात; अकराला बैठक; नूतन 'सीईओ'नी पदभार स्वीकारला 

By नितीन काळेल | Updated: February 6, 2024 17:42 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंगळवारी सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन ...

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंगळवारी सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर आकराच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावाही घेतला.राज्य शासनाने सोमवारी राज्यातील काही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. तर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या २०२० च्या आएएस अधिकारी आहेत. त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या.बदली झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना तसेच सातारा जिल्हातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी स्वागत केले.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोदी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. विभागाचे काम, सध्या सुरू असणारी कामे, कामाची प्रगती आदींविषयी माहिती घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद