शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडी जिल्ह्यात बिघाडी; शिवसेनेला राष्ट्रवादी विश्वासात घेत नाही - नितीन बानुगडे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:20 IST

आमच्याही शेखर गोरे या शिवसेनेच्या वाघाने त्यांच्याविरोधात संचालक पदाची निवडणूक लढवून जिंकली.

दहीवडी : ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी शिवसेनेला विश्वासात घेत नाही. राज्यात सत्तेत एकत्र असताना जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला. आमच्याही शेखर गोरे या शिवसेनेच्या वाघाने त्यांच्याविरोधात संचालक पदाची निवडणूक लढवून जिंकली. शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी एकमेकांना कायम विरोध करणारे एकत्र आले. तरीही एकाकी झुंज देत बँकेत प्रवेश केला,’’ असे गौरवोद्गार शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.दहीवडी येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकारी व शिवसैनिकांच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी निरीक्षक प्रशांत काळे, ठाणेचे नगरसेवक तात्यासाहेब माने, विशाल पावसे, सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे, छाया शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, रामभाऊ जगदाळे, शहाजीराजे गोडसे, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे, राजेंद्र जाधव, वैभव मोरे उपस्थित होते.प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘माण खटाव मतदारसंघात स्वखर्चातून कामे करणारे शेखर गोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत शिवधनुष्य पेलण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत त्यांनी मतदारसंघात शिवसेना वाढवण्याबरोबरच राज्यात नावलौकिक मिळवलेल्या जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक म्हणून ते जाऊन बसले आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये  जिल्ह्यात आपल्याला शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे.’जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘स्वखर्चातून विकासकामे करणारे शेखर गोेरे हे राज्यात एकमेव नेते आहेत. या मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनीही शेखरभाऊंच्या पाठीशी उभे राहावे.’वैभव मोरे म्हणाले, ‘मतदारसंघात शेखर गोरे यांनी आजपर्यंत स्वखर्चातून जनतेची कामे केलीत. प्रत्येक निवडणुका स्वखर्चातून लढवल्यात. माण मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेनेला नेहमीच कमी लेखत आहे. आम्ही दोन तीन निवडणुका एकत्र लढवण्यासाठी प्रयत्न केला; परंतु शिवसेनेला कमी समजण्याची मोठी चूक त्यांनी केली. शेखर गोरे यांनी त्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवून त्यांना शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत पक्षश्रेष्ठी देतील तो मान्य असेल.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण