शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील संग्रहालयात महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 12:38 IST

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली ...

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची ही नाममुद्रा चांदीची असून, ती फारसी भाषेत आहे. वाघनखांबरोबरच ही नाममुद्रादेखील इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.वाघनखांबरोबर शस्त्र प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची नाममुद्रादेखील प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. नाममुद्रा साधारणपणे १९७६ रोजी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथून साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात सामील झाल्याची नोंद आहे.

अशी आहे नाममुद्रा..

  • प्राचीन काळापासून शिक्क्यांचा वापर होत आला आहे. शिक्का म्हणजे ‘नाममुद्रा’ आणि मोर्तब म्हणजे ‘समाप्तीमुद्रा’.
  • महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा गोलाकार असून तिचा व्यास एक इंच आहे.
  • छत्रपतींच्या नाममुद्रा देवगिरी व संस्कृत लिपीत आढळतात. मात्र, येसूबाई यांची नाममुद्रा फारसी भाषेत आहे.
  • या मुद्रेवर तीन ओळीचा लेख आहे. ‘राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई’ असा त्याचा अर्थ आहे.
  • यातील ‘सनह अहद’ या शब्दाचा अर्थ पहिले वर्ष असा आहे. फारसी भाषेत प्रथम वर्षाला अहद असे म्हणतात.
  • या नाममुद्रेबरोबर ‘मोर्तब सूद’ अशी लहान आकाराची आणखी एक मुद्रा असून पत्राच्या शेवटी याचा वापर केला जात असावा.
  • मुद्रांवरील अक्षरे उलट कोरलेली असायची जेणेकरून शिक्का कागदावर उमटवताना तो सरळ उमटेल.
  • महाराणी येसूबाई यांची मुद्रा उमटलेले कुठलेही पत्र अजून उपलब्ध झालेले नाही.

स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वगाथेला तोड नाही. त्यांची नाममुद्रा प्रथमच संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. फासरी भाषेतील ही नाममुद्रा इतिहासप्रेमींचे आकर्षण ठरली आहे. - प्रवीण शिंदे, संग्रहालय अभिरक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसर