शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
4
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
5
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
6
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
7
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
8
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
9
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
10
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
11
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
12
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
13
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
14
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
15
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
16
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
17
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
18
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
19
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
20
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे केले नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:59 IST

गेल्या दहा वर्षांपासून नामकरणासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश

कोयनानगर : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोयना परिसरासह पाटण तालुक्यात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याची भावना भाजपा पाटण तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी व्यक्त केली.सुर्वे म्हणाले, ‘कोयना धरणाचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्यात यावे. या मागणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गांभीर्याने घेत सविस्तर अहवाल मागविला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेटीनंतर २६ डिसेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना धरणाच्या नावात तातडीने बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोयना धरणाचे अधिकृत नाव ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा नेते सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार यांच्यासह जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सुर्वे यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Koyna Dam entrance renamed: Shri Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar.

Web Summary : The Koyna Dam entrance is now named 'Shri Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar' after a decade-long effort. BJP leader Nandkumar Surve expressed satisfaction, acknowledging key figures like Fadnavis and Vikhe-Patil for their support in this historic decision.