शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:27 IST

वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भक्तांना सुरक्षित भागातच स्नान करावे लागले

विकास शिंदे फलटण : नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी!                अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!  'ग्यानबा-तुकाराम' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज गुरुवारी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. तत्पूर्वी नीरा नदीच्या पवित्र पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी उपस्थित माऊली भक्तांनी माऊली माऊलीचा जयघोष करत टाळ मृदुगांच्या आवाजाने नीरा नदीच पात्र दुमदुमून सोडलं. माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला परंपरागत  महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या नीरा पुलावरून दत्त घाटावर प्रवेश केला  टाळ व मृदुगाच्या जयघोषा बरोबर माऊलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळी बरोबर वाद्यांचा निनाद सुरू होता पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले यानंतर प्रशासना तर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

माऊलींना शाही  स्नान व पाद्य पूजा पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्य पूजन करण्यात आले यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. परंपरे प्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलींच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान सुरू होते. भक्तांचेही स्नान झाले व सोहळ्याला नवी ऊर्जा मिळाली. 

नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढया वर्षी वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा दत्त घाटावर पाणी आले होते. त्यामुळे दरवर्षी मनसोक्त नीरा स्नान करणाऱ्या भक्तांना सुरक्षित भागातच स्नान करावे लागले.