शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सूर्य कोपला; सातारा जिल्ह्यातील फलटणचा पारा ४४ अंशांवर पोहोचला, आरोग्य विभाग सुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:33 IST

फलटण : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना आता फलटणच्या पाऱ्याने यंदाच्या हंगामातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. ...

फलटण : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना आता फलटणच्या पाऱ्याने यंदाच्या हंगामातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सूर्यनारायण कोपल्याने नागरिक अक्षरश: घामाघूम झाले असून, उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम दिसू लागला आहे.एप्रिल महिना सुरू झाल्यापासून फलटणचा पारा सातत्याने वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी पारा ४२ अंशांवर पोहोचला होता. जो यंदाच्या हंगामातील उच्चांक होता. मात्र, मंगळवारी शहराचा हा उच्चांक मोडीत काढत ४४ अंशांवर स्थिरावला. उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने शहरातील रस्ते, मुख्य बाजारपेठ दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत. गर्दीने गजबजणाऱ्या ठिकाणांवर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत शुकशुकाट पसरत आहे. अधिकारी अनभिज्ञ फलटणला उच्चांकी तापमानाची नोंद होत असली तरी प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उलट प्रशासनाकडे उच्चांकी तापमानाची कोणतीही नोंद नाही. याबाबत कृषिविभाग, फलटण पालिका, तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते.

आरोग्य विभाग सुस्तराज्यासह फलटण शहरात उष्णतेची लाट पसरली असताना आरोग्य विभागाने नागरिकांना सूचना व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपत्कालीन व्यवस्था म्हणून प्रशासनाने मदत केंद्र सुरू करणे क्रमप्राप्त आहे; परंतु आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानphaltan-acफलटण