शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

“येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण; लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:36 IST

पाल नगरी झाली सोनेरी

अजय जाधवउंब्रज: “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोष, भंडाऱ्याची उधळण अन् लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री. खंडोबा म्हाळसा याचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळयासाठी लाखो वऱ्हाडी भाविक पाल येथे दाखल झाले होते. परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या सागवानी रथातून मिरवणुकीची सुरुवात प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून झाली. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून  खंडोबाची व-हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघाली प्रत्येक व-हाडी मंडळीच्या पूढे वाद्धयवृंद वाजवत ही मंडळी यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट असा गजर करत होते.ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोचली. नंतर व-हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पाल नगरी सोनेरी झाल्याचे चित्र  दिसून येत होते. रात्री पासून या विवाह सोहळयाला वऱ्हाडी भाविक पालमध्ये दाखल झाले होते. भाविकांना खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्याचे देवळात व्यवस्थीत दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शनबारीची खास सोय केली होती. यात्रेकरुसांठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, आदी सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणा-या भाविकांसाठी उंब्रज,सातारा, कराड, पाटण येथून एस.टी.महामंडळाने जादा बसची सोय केली होती. पोलिस प्रशासनाने आत्पकालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात करण्यात आली होती. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामकदलाची पथके, आरोग्यविभाग पथके, रुग्णवाहीका, सज्ज ठेवण्यात आली होती. तर आत्पकालीन उपयोगासाठी पाल-वडगांव-इंदोली मार्ग पुर्णता मोकळा ठेवण्यात आला होता. यात्रा कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हनून पोलिस यंत्रणेने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यात्रा कालावधीत कायदासुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा कमेटी, यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Khandoba-Mhalsa Wedding Celebrated with Devotion and Grandeur in Pal

Web Summary : Lakhs thronged Pal for the Khandoba-Mhalsa wedding. Festivities included a procession, traditional rituals, and vibrant 'bhandara' celebrations. Authorities ensured security and facilities for devotees.