शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्येच सातारा जिल्हा तापला; पारा ३८ अंशाजवळ गेला

By नितीन काळेल | Updated: March 5, 2025 19:14 IST

किमान अन् कमाल तापमानात २० अंशाचा फरक 

सातारा : जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासून पारा वाढत चालला आहे. पूर्व भागात ३८ अंशावर कमाल तापमान गेले आहे. तर सातारा शहरात ३७.५ अंशापर्यंत नोंद झालेली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात २० अंशाचा फरक असल्याने पहाटे थंड हवेची झुळूक ही आहे.जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशी थंडी राहते. पण, यावर्षी हिवाळ्यात काहीच दिवसच पारा खालावला होता. त्यातच थंडीचे प्रमाणही कमी राहिले. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या मध्यापासून कमाल तापमानात वाढ होत गेली. परिणामी थंडी गायब झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू उन्हात वाढ होत गेली. कमाल तापमान ३५ अंशावर गेले. यामुळे यंदा उन्हाची तीव्र लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हा अंदाज बरोबर ठरताना दिसून येत आहे. कारण, मागील १५ दिवसांपासून पारा सतत वाढत गेला आहे.

सातारा शहरातील पारा सतत ३५ अंशावर आहे. सोमवारी तर ३७.५ अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान ठरले होते. तर मंगळवारी पारा थोडासा खाली आला. पण, ३५ ते ३६ अंशावर कायम आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण हे दुष्काळी तालुके. या तालुक्यातील तापमान साताऱ्यापेक्षा अधिक असते. सध्या या तालुक्यातील पारा ३८ अंशावर गेला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने आणखी तापदायक ठरणार आहेत. तसेच सध्याच उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतीच्या कामावर परिणाम झालेला आहे. दुपारच्या सुमारास तर ग्रामीण भागातील रस्तेही ओस पडलेले दिसत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान