शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दिवसात कोयनेला १३९ मिलीमीटर पाऊस; धरणात साडे पाच हजार क्यूसेकने आवक सुरू

By नितीन काळेल | Updated: June 21, 2024 19:00 IST

गतवर्षी पाऊस अन् पाणीसाठाही कमी..

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात नवजा येथे सर्वाधिक १४८ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे १३९ आणि महाबळेश्वरला ७४ मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडे पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच सध्याही पूर्व भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झालाय. वापसा नसल्याने पेरणीला उशिरा होण्यास सुरूवात होऊ शकते. तसेच ओढ्यांना पाणी वाहत असून बंधारेही भरले आहेत. तर विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. तर पश्चिम भागात सुरूवातीला पाऊस झाल्यानंतर आठ दिवस उघडझाप होती. तुरळक प्रमाणातच पाऊस पडत होता. पण, बुधवारपासून पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. त्यामुळे येथून पुढील दिवस हे पावसाचेच असणार आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे जून महिन्यात आतापर्यंत ५५२ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तसेच महाबळेश्वरलाही एकूण ३६१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळासह पाटण तालुका आणि कांदाटी खोऱ्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.कोयना धरणात सुमारे साडे पाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १५.६१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. १४.८३ ही टक्केवारी आहे. तर मागील १५ दिवसांपासून धरणातील विसर्ग बंद आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आदी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे.

गतवर्षी पाऊस अन् पाणीसाठाही कमी..जिल्ह्यात पावसाला उशिरा सुरूवात झाली हाेती. २१ जूनपर्यंत कोयनेला फक्त ७७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर नवजा येथे ८३ आणि महाबळेश्वरला १०० मिलीमीटर पाऊस पडलेला. तर कोयना धरणात १०.८९ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा पाऊसही अधिक झाला आहे. तसेच कोयना धरणात पाणीसाठाही जादा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण