शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पोलिसांनी वेशांतर करून चोरटे पकडले; अर्धा किलो सोन्याचे दागिने हस्तगत

By सचिन काकडे | Updated: April 20, 2024 15:53 IST

पोलिसांनी वेशांतर करून सलग चार दिवस पाळत ठेवली, ३६ लाखांच्या ऐवजासह दोघांना अटक

सातारा : कऱ्हाड येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे ५२ तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. याची किंमत ३६ लाख ४० हजार रुपये आहे. रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिंवडी, जि. ठाणे) व नीलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सातारा आणि कऱ्हाड पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दि. ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत कऱ्हाड येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका घरात चोरी झाली होती. अज्ञात चाेरट्यांनी घरातून सोन्याचे ३७ लाख ९४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. ही घटना उघडकीस येताच पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना तपासाच्या सूचना दिल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व कऱ्हाडच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने पोलिस पथके तयार करून तपासाची चक्रे गतिमान केली.या पथकाने घटनास्थळी वेळोवेळी भेट दिली. तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीचा आधार घेत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा क्रमांक प्राप्त केला. या वाहनाची पडताळणी केली असता ते वाहन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी वेशांतर करून सलग चार दिवस ठाणे येथील रमेश कुंभार याच्या घराजवळ पाळत ठेवली. दरम्यान, दि. ६ एप्रिल रोजी रमेश कुंभार हा सातारा बसस्थानकात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याच्या सोबत असलेल्या नीलेश गाढवे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कऱ्हाड येथील घरफोडीची कबुली दिली.त्यांच्याकडून घरफोडीतील दागिन्यांपैकी ५२ तोळे वजनाचे ३६ लाख ४० हजारांचे दागिने व एक चारचाकी वाहन, असा एकूण ४१ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या चोरट्यांनी फलटण भागात काही गुन्हे केले असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस