शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बावधनमध्ये घुमला ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर, बगाड यात्रा उत्साहात; परदेशी पाहुण्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:07 IST

बावधन : तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या ...

बावधन : तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते बगाडाचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी केलेली गुलालाची उधळण, ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर अन् पारंपरिक वाद्याच्या गजराने आसमंत दणाणून गेला.बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाड्याचा मान मिळालेल्या अजित ननावरे यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. यानंतर त्यांना वाजतगाजत बगाडाजवळ नेण्यात आले.येथे पारंपरिक पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. सकाळी साडेअकरा नंतर बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या. बगाडाच्या मागे असलेल्या ग्रामदेवतांच्या पालख्यांचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.

दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली. दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली.सायंकाळी साडेपाच वाजता बगाड शेतशिवारातून पक्क्या स्त्यावर आले. नंतर ते वाई सातारा रस्त्यावर आले आणि रात्री आठ वाजता बावधन गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.परदेशी पाहुण्यांची हजेरीबगाड यात्रेला राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावली तसेच ब्राझील येथील काही पर्यटकही यात्रा पाहण्यासाठी आले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा पाहून पर्यटकही भारावून गेले. अनेकांनी हा भक्ती व शक्तीचा हा साेहळा आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाई