शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याचा ढेबेवाडी खोऱ्याला तडाखा, घरांचे पत्रे गेले उडून; केळी बागांचेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:05 IST

अचानक जोराच्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचा फटका मत्रेवाडी, निवी, कासणी, उमरकांचन, जिंती, मराठवाडी, भोसगाव या गावांना बसला आहे

सणबूर : ढेबेवाडी विभागाला वादळी पावसाचा तडाखा बसला असून मत्रेवाडी, ता. पाटण येथे घराचे पत्रे उडून दोन कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. तर जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने विभागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून वैरणीच्या गंजी उडून गेल्या आहेत. तसेच केळीच्या बागा पडून मोठे नुकसान झाले आहे. भोसगाव येथे बाभळ रस्त्यावर पडल्याने जिंती भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.काल, बुधवारी सायंकाळी अचानक जोराच्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचा फटका मत्रेवाडी, निवी, कासणी, उमरकांचन, जिंती, मराठवाडी, भोसगाव या गावांना बसला आहे. मत्रेवाडी येथे धोंडीबा यशवंत मत्रे, सदाशिव यशवंत मत्रे यांच्या घराचे पत्रे उडून जाऊन घरातील साहित्य भिजले व घराची भिंतही कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.

भोसगाव येथे गणपती मंदिराजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडले, यामुळे जिंती भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मराठवाडी परिसरात झाडे उन्मळून पडली आहेत. या परिसरात वादळाच्या तडाख्याने वीजही गायब झाली आहे. भोसगाव येथे केळीच्या बागांनाही वादळी तडाखा बसून मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस