शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप, कोयनेचे दरवाजे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:21 IST

यंदा प्रथमच सहा दरवाजातून विसर्ग

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून, दिवसभरात कोयना येथे ४, तर महाबळेश्वरला अवघा २ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच प्रमुख धरण क्षेत्रांतही पावसाची विश्रांती असल्याने विसर्गात घट झाली आहे, तर रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले. पायथा वीजगृहातूनच विसर्ग सुरू होता, तर सायंकाळी धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.            जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, बुधवारपासून पावसाचा जोर कमी होत गेला. शुक्रवारी तर दिवसभर पावसाची उघडीप होती. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २४, नवजा २५ आणि महाबळेश्वरला २० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. पण, सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना ४, नवजा ७ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पाऊस पडला. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची उघडीप होती. त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे. सायंकाळी २१ हजार क्यूसेक वेगाने धरणात पाणी येत होते, तर धरणात ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही सहा टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. त्यामुळे रात्री ८ वाजता धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या मोठ्या धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे.

यंदा प्रथमच सहा दरवाजातून विसर्गजिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जुलैतही चांगले पर्जन्यमान झाले. कोयना धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात १५ जुलैला प्रथम धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर एक ऑगस्टला दरवाजे बंद झाले. मात्र, दि. १५ ऑगस्टपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी १७ ऑगस्टला दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडले. तसेच १३ फुटांपर्यंतवर दरवाजे घेऊन पाणी सोडण्यात आले. सध्या पाऊसच नसल्याने धरण भरण्यासाठी दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.