शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Satara: कासवरील फुलांच्या पर्वणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात, ऑफलाईन तिकिटाद्वारे फुले पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:02 IST

पठारावर मिकी माऊसची पिवळी फुले काहीशी उपलब्ध

पेट्री : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरत चालला आहे. पुष्पपठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. यावर्षीचा कास पुष्प पठारावरील फुलांच्या पर्वणीचा सूर्योदय मावळत चालला असून, १५ ऑक्टोबरपासून ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले आहे.पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धम्मक छटा अद्यापही काही ठिकाणी तुरळक पाहायला मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले असले, तरी येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार ऑफलाईन पद्धतीने ५० रुपये पर्यटन शुल्क भरून फुले पाहता येतील, असा निर्णय कास पठार समिती व वन विभागाच्या बैठकीमध्ये झाला.

कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रानफुलांचा हंगाम मावळतीबरोबरच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघही ओसरल्याचे चित्र आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम ४ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.

सध्या पठारावर दहा ते बारा प्रकारची तुरळक फुले असून, पिवळी मिकी माऊस व कुमुदिनीला मध्यम बहर असून, सद्यस्थितीत गवत वाढल्याने पठारावर २० टक्के फुले असून, वातावरण चांगले राहिल्यास कुमुदिनी फुलांचा दहा दिवस हंगाम टिकून राहील. - ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास पठार समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Kas Flower Season Ends; Offline Tickets Available After October 15

Web Summary : Kas Plateau's flower season nears its end. Online booking closed on October 15th, but offline tickets are available for ₹50. Limited flower varieties remain, including Mickey Mouse flowers. Kumudini flowers may last ten more days.