शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला, दुचाकींना धडक देत ट्रक रुग्णालयाच्या आवारात घुसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:30 IST

अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला

कऱ्हाड : ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रक दोन दुचाकींना धडक देत रुग्णालयाची भिंत पाडून आतमध्ये घुसला. शहरातील भेदा चौकात शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.हनुमंत भारत ढोले (वय ३५, रा. कायापूर, जि. धारासिंग), असे ट्रकचालकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तासगावहून एक ट्रक विट्याला जाण्यासाठी कार्वेनाका मार्गे येत होता. शहरानजीच्या कार्वेनाका येथे रात्री उशिरा ट्रक आला असता ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याच परिस्थितीत त्याने ट्रक पुढे घेतला.मात्र, भेदा चौकात असलेल्या वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे चौकात रस्त्यानजीक पार्क केलेल्या दोन दुचाकींना धडक देत ट्रकने रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यामध्ये संपूर्ण भिंत कोसळली. अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला.अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून चालकाचा शोध सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण यांच्यासह पथकाने रविवारी दुपारी ट्रकचालक हनुमंत ढोले याला ताब्यात घेतले आहे. जखमी असल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAccidentअपघातhospitalहॉस्पिटल