शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटला, चालक ठार; नागरिकांनी पळवली कलिंगडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:13 IST

शिरवळ : चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना घडली. खंडाळा तालुक्यातील शिदेंवाडी गावच्या हद्दीत शिरवळ-भोर जाणा-या ...

शिरवळ : चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना घडली. खंडाळा तालुक्यातील शिदेंवाडी गावच्या हद्दीत शिरवळ-भोर जाणा-या महामार्गावर एका वळणावर हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश महादेव मदने (वय ३८, रा.नातेपुते ता. माळशिरस जि.सोलापूर ) असे मृत्यू टेम्पो चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर टेम्पोमधील कलिंगडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांनी तब्बल ५० हजाराची कलिंगडे पळवली.याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नातेपुते जि.सोलापूर येथील राजवल्ली हिरालाल तांबोळी यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक (एमएच-१२-केपी-४९८६) वर उमेश मदने हे चालक म्हणून काम करत होते. दरम्यान, काल मंगळवारी (दि.५) टेम्पोमध्ये कलिंगडे भरून ते रायगड जिल्ह्यातील माणगाव याठिकाणी निघाले होते. यावेळी भोर-शिरवळ रस्त्यावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास चालक मदने याला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो उलटला.यावेळी पाठीमागे असलेल्या टेम्पो चालक संतोष झेंडे यांनी व उपस्थित नागरिकांनी जखमी मदने यांना रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद संतोष झेंडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन वीर हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात