शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडमधील 'शिवशंकर' पतसंस्थेच्या ठेवीदारांची पोलिसांकडे तक्रार, लोकमत'च्या बातमीमुळे सभासद झाले जागे

By प्रमोद सुकरे | Updated: October 21, 2022 16:01 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर ही संस्था व संस्थेचे व्यवहार ठप्प असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी उपनिबंधकांकडे धाव घेत ठेवी परत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे.

कऱ्हाड:  ऐन दिवाळीच्या तोंडावर कऱ्हाड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांना धक्का बसला आहे. ही पतसंस्था गेली काही दिवस बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेचे ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी शुक्रवारी कराड शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.'शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प; ठेवीदार अस्वस्थ' अशी बातमी लोकमत'ने प्रसिद्ध केली. त्यामुळे जे लोक या प्रकारापासून अनभिज्ञ होते तेही जागे झाले. सकाळी ११ च्या सुमारास कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये सभासद, ठेवीदार यांनी मोठी गर्दी केली होती. त्या सर्वांनी आमच्या ठेवी परत द्यायला टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करावी अशा तक्रारी दाखल केल्या.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही दिवसापासून या पतसंस्थेबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असतानाच ही पतसंस्था १० दिवसापासून बंद असल्याने सभासद व ठेवीदारांच्यात  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही संस्था व संस्थेचे व्यवहार ठप्प असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी उपनिबंधकांकडे धाव घेत ठेवी परत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे.दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदार व सभासदांची नुकतीच एक मीटिंग घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने सभासद ठेवीदार उपस्थित होते. या सर्वांनी संस्थे विरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पतसंस्थेचे ठेवीदार, सभासद मोठ्या संख्येने कऱ्हाड शहर पोलीस स्टेशनला एकत्र येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना भेटले. शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी करून सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत अशी त्यांनी मागणी केली.यावेळी उदय हिंगमिरे, शाहिबाज आगा, गौतम करपे, दत्तात्रय तारळेकर, दिलीप पाटील, राजीव खलिपे, सुनील महाजन, राजेंद्र भादुले आदीसह महिला ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी