शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेकोटीसमोर बसलेल्या मनोरुग्णाचा होरपळून मृत्यू, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: January 20, 2024 16:36 IST

..अन् सातारकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

सातारा : वेड्याच्या भरात अंगावर वेगवेगळ्या कपड्यांच्या चिंध्या गुंडाळून शेकोटी शेजारी बसलेल्या मनोरुग्णाचा होपरपळून दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री राजवाडा परिसरात घडली. गोपाल विजयकुमार लकेरी (वय ४९, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजवाडा परिसरातून सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना अर्धवट जळालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे हे स्वत: कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हा प्रकार पाहता खून की आत्महत्या आहे, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. मृत गोपाल लकेरी यांचा भाऊ प्रवीण लकेरी याला घटनास्थळी आणल्यानंतर त्याचाच भाऊ असल्याचे त्याने ओळखले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ गोपाल हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले. त्याच्यावर पुणे येरवडा येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमर पाटील यांच्याकडे उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी त्याला साताऱ्यात घरी आणले होते. परंतु तो वेड्याच्या भरात घरातून निघून जायचा. अंगावर वेगवेगळ्या कपड्याच्या चिंध्या गुंडाळून शहरात तो दिवसभर फिरायचा. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री राजवाडा परिसरातील नगर वाचनालयासमोर गोपाल हा शेकोटी करून बसला होता. यावेळी त्यांच्या अंगावरील कपड्याच्या चिंध्यास आग लागली. यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. हा प्रकार मध्यरात्री घडल्यामुळे कोणाच्याही निदर्शनास आला नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. ..अन् सातारकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वासराजवाडा परिसरात एका व्यक्तीला जाळून मारून खून केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. भर वस्तीतच हा प्रकार निदर्शनास आल्याने मोठा पोलिस फाैजफाटाही घटनास्थळी दाखल झाला. आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर दुसरीकडे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू होते. काही वेळातच पोलिसांनी या प्रकरणातील वस्तूस्थिती समोर आणल्याने सातारकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस