शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

By दीपक शिंदे | Updated: November 11, 2022 19:55 IST

त्याच्या ताब्यात कुणी आले तर सहजासहजी सोडत नाही

सातारा : ‘भाजप-सेना युती असतानाही राष्ट्रवादीने बेईमानीतून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा करून त्यांना आपल्याकडे वळवले. त्यांच्यावर ज्याने जादूटोणा केला तो भोंदू संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याच्या ताब्यात कुणी आले तर सहजासहजी सोडत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.सातारा येथील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांच्या महाविकास आघाडीचा काळ येणार असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, ‘ते अजून स्वप्नात आहेत. त्यांनी स्वप्ने पाहणे सोडून द्यावे.’खासदार सुप्रिया सुळे यांनी सीतारामन यांना दिलेल्या आव्हानाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे. आठ वर्षांत सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील गावांचा घरोघरी दौरा केला नाही. आम्ही तीन महिन्यांत दौरा केला. राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीत बंद पाडणार आहे, त्यादृष्टीने आम्ही काम सुरू केले आहे.’सातारा जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यांना मंत्रिपदाचा शब्द फडणवीस यांनी दिला होता. याबाबत छेडले असता, बावनकुळे यांनी मी आजच मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबत फोन करून हा निरोप पोहोच करेन.ईडीबाबत ठाकरे यांच्याकडून भाजपवर आरोप होत असल्याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘अडीच वर्षांत राज्यातील सीआयडी, अँन्टीकरप्शन आदी तपास यंत्रणा तुमच्याकडे होत्या. मग का गप्प बसला. सत्ता गेल्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करण्यात येत आहेत. सरकारकडून भाजपच्या नेत्यांवर कारवाई होत नाही म्हणता तर सोमय्या यांनी कोर्टाचा आदेश आणला तसा तुम्ही आणा, असे आव्हान त्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी आहे. असेही ते म्हणाले.’अजित पवार यांचा फोन स्वीच ऑफ आहे. ते संपर्कात आहेत का? यावर बावनकुळे म्हणाले, अजित पवार काय करतील, हे त्यांनाच माहीत असते. ते भाजपला कसे ठाऊक असेल.नगरपालिका निवडणूक भाजपच्याच चिन्हावरसातारा नगरपालिका निवडणुकीबाबत पक्षाची शिस्त पाळली नाही तर पक्ष काय भूमिका घेणार? या प्रश्नावर बावनकुळे यांनी ‘भाजपच्याच चिन्हावर सातारा पाालिकेची निवडणूक लढविली जाईल व नगराध्यक्ष भाजपचाच असेल. दोन्ही राजेंनी एकत्र येण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसेच आपण स्वत: प्रयत्न करू,’ असे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवार