शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा गारठला! पारा १३ अंशापर्यंत घसरला, जागोजागी शेकोट्या पेटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 14:22 IST

महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला.

सातारा : उत्तरेकडून थंडगार वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातही याचा परिणाम झाल्याने पारा घसरला आहे. शनिवारी सातारा शहराचे किमान तापमान १३.०२ अंशापर्यंत खाली आले होते. तर महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला. यामुळे जिल्ह्यातील गारठ्यात आणखी वाढ झाली असून जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात यावर्षी थंडीला १५ दिवस अगोदर सुरुवात झाली आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून थंडी जाणवते. पण, यंदा ऑक्टोबरच्या मध्यानंतर जिल्हा गारठू लागला. सुरुवातीला काही दिवस किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर पारा वाढत गेला. सातारा शहरात तर २० अंशावर किमान तापमान गेलेले. त्यामुळे उकाडाही जाणवत होता. त्यानंतर मात्र, पारा घसरला. पण, १५ अंशाच्या खाली आला नव्हता. असे असतानाच दोन दिवसांपासून उत्तरेकडून थंडगार वारे वाहत आहेत. याचा परिणाम वातावरण बदल करण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे जिल्ह्यातील पारा एकदम १५ अंशाखाली आला आहे.सातारा शहरात शुक्रवारी १५.०२ किमान तापमान होते. मात्र, शनिवारी दोन अंशाने उतरले. त्यामुळे साताऱ्याचा पारा १३.०२ अंश नोंद झाला. या हंगामातील हे आतापर्यंतचे निच्चांकी तापमान ठरले. यापूर्वी सातारा शहरात दोनवेळा १३.०२ अंशा तापमानाची नोंद झालेली. त्याचबरोबर महाबळेश्वर परिसरात गारठा कायम आहे. शनिवारी १२.०५ अंशाची नोंद झाली.सातारा शहरातील किमान तापमान असे:दि. ४ नोव्हेंबर १७.०९,  दि. ५ - १६.०३,  दि. ६ - १६.०९ , दि. ७ - १५.०५,  दि. ८ - १५,  दि. ९ - १५.०८,  दि. १० - १४.०७,  दि. ११ - १५.६,  दि. १२ - १६.०८, दि. १३ - १५,  दि. १४ - १६.०४,  दि. १५ - १७.०४,  दि. १६ - १५.०५,  दि. १७ - १३.०४,  दि. १८ -  १५.०२ आणि १९ नोव्हेंबर १३.०२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान